प्रवासादरम्यान प्रवाशांना मिळते वैद्यकीय मदत

वैद्यकीय सुविधांचा १ हजार १३ प्रवाशांनी घेतला लाभ

    दिनांक :17-Oct-2024
Total Views |
नागपूर, 
Medical assistance during travel : रेल्वे प्रवासादरम्यान आणि स्थानकांवर तत्पर आणि कार्यक्षम वैद्यकीय मदत देऊन प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे कार्य मध्य रेल्वेचा नागपूर विभाग करीत आहे. आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी रेल्वेने वैद्यकीय सुरु केली आहे. नागपूर विभागाच्या वैद्यकीय पथकाने जुलै ते १५ ऑक्टोबर पर्यंत एकूण १ हजार १३ प्रवाशांनी भेट देत वैद्यकीय सुविधांचा लाभ घेतला. रेल्वे प्रवासादरम्यान गरजू प्रवाशांना वेळीच वैद्यकीय मदत मिळावी यासाठी ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
 
 
HJUH
 
 
प्रवाशांना अत्यावश्यक आरोग्य सेवा देण्यासाठी वैद्यकीय पथक तयार असल्याने प्रवाशांना मदत आहे. कोणत्याही प्रवाशांना प्रवासादरम्यान वैद्यकीय मदतीची गरज पडल्यास १३९ डायल करून आपत्कालीन हेल्पलाइनचा उपयोग करावा, असे आवाहन रेल्वेने केले आहे. रेल्वेच्या हेल्पलाइन संदेश मिळताच जवळच्या स्थानकावर वैद्यकीय पथकांची व्यवस्था करण्यासह आपत्कालीन मदत केल्या जाते. याशिवाय तिकीट परीक्षकांची मदत प्रवासी घेऊ शकतात.