ट्रेलरनंतर आता 'सिंघम अगेन' चित्रपटातील पहिले गाणे रिलीज

गाणं पाहून चाहते म्हणाले, जय बजरंगबली

    दिनांक :20-Oct-2024
Total Views |
ट्रेलरनंतर आता 'सिंघम अगेन' चित्रपटातील पहिले गाणे रिलीज,
गाणं पाहून चाहते म्हणाले, जय बजरंगबली
singham again 2024 'सिंघम अगेन'चे पहिले गाणे 'जय बजरंगबली' रिलीज झाले आहे. हनुमान चालिसाने प्रेरित हे गाणे ऐकून चाहते उत्साहित झाले आहे. म्युझिक व्हिडीओवर 'जय बजरंगबली' लिहून ते आपला उत्साह व्यक्त करत आहे. अजय देवगनचा आगामी चित्रपट 'सिंघम अगेन' च्या निर्मात्यांनी नुकतेच या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज केले आहे. या चित्रपटात अजय देवगनसह रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ सारखे कलाकार आहेत. 'सिंघम अगेन' चित्रपटातील पहिलं गाणं 'जय बजरंगबली' चित्रपटातील अध्यात्म आणि उर्जेची अनुभूती देते.
हनुमान चालिसाने प्रेरित असलेला हा सशक्त ट्रॅक सणाच्या दिवसात योग्य साऊंडट्रॅक आहे. सुधांशू, रितेश जी राव, सात्विक जी राव, पृथ्वी चंद्रा, लक्ष्मी नायडू, श्रुती रंजनी, प्रणती, ऐश्वर्या दारुदी, साहित्य चगंटी, मनीषा पांडरंकी, श्रुतिका, लक्ष्मी मेघना, नादप्रिया या गायकांनी जय बजरंगबली गाण्याला आपला आवाज दिला आहे. हे गाणे थमन एस यांनी संगीतबद्ध केलं आहे. गाण्याचे गीत स्वानंद किरकिरे यांनी लिहिले आहे. दमदार ट्रॅक, भक्तिभावना मिश्रित हे गाणं आहे.
 
singham again
 
 या दिवशी होणार प्रदर्शित
'सिंघम अगेन' singham again 2024 चित्रपटाचा ट्रेलर ७ ऑक्टोबर रोजी रिलीज झाला आहे. जिथे त्याच्या विलक्षण कथेची झलक पाहायला मिळत आहे. सिंघमच्या या भागात, निर्भय बाजीराव सिंघम आपल्या टीमसह पत्नी अवनीला वाचवण्याच्या मोहिमेवर निघतो. 'सिंघम अगेन' हा चित्रपट हिंदू महाकाव्य रामायणापासून प्रेरित आहे. चित्रपटात लोकप्रिय पात्रे ही आधुनिक शैलीत मांडली आहेत. अजय देवगन हा भगवान राम यांच्या भूमिकेत आहे. तर टायगर श्रॉफ हा लक्ष्मणच्या भूमिकेत आहे. रणवीर सिंग भगवान हनुमानाची भूमिका साकारत आहे तर अक्षय कुमार जटायूची भूमिका साकारत आहे.
 
'सिंघम अगेन' singham again 2024 हा लोकप्रिय कॉप युनिव्हर्स चित्रपट १ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला देखील सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या २४ तासांत हा ट्रेलर १३८ दशलक्ष वेळा प्रेक्षकांनी पाहिला आहे. नुकतेच या चित्रपटातील गाणे रिलीज झाले आहे.