धानोरा तालुक्यात परतीच्या पावसाने धान पिकाचे मोठे नुकसान

    दिनांक :21-Oct-2024
Total Views |
धानोरा,
Huge loss to farmers तालुक्यात १८ ऑक्टोबरच्या सायंकाळी विजांचा कडकडाट आणि वादळासह सरासरी एक तास पडलेल्या पावसामुळे तसेच १९ व २० आक्टोबरला पडलेल्या पावसाने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी धानोरा तालुक्यातील रांगी येथील शेतकरी नरेंद्र भुरसे व अन्य शेतकर्‍यांनी केली आहे.
 
khgyyyhh
 
धानोरा तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता संपुर्ण तालुक्यात परतीच्या अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात शेतकर्‍यांच्या तोंडचा घास पावसाने पळविला. Huge loss to farmers या वादळात अनेक शेतकर्‍यांचे कापणीयोग्य धान पिक अक्षरशः जमीनीवर झोपले व नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला. तसेच शेतात कापणी केलेले धानपिक बांधण्यात पाणी साचल्याने तरंगायला लागल्याने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
 
आधिच करपा, बेरड, मानमोडी, घाटे अळीने पिक फस्त केले. त्यामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी पुन्हा अवकाळी पावसाने बेजार झाला आहे. Huge loss to farmers त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी व विमा कंपनीने सुद्धा याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी रांगी येथील शेतकरी नरेंद्र भुरसे व तालुक्यातील अन्य शेतकर्‍यांनी केली आहे.