मीरा फडणीसचा जामीन फेटाळला

    दिनांक :26-Jul-2024
Total Views |
- विदर्भातील सत्तर जणांची फसवणूक

यवतमाळ, 
संपूर्ण विदर्भातील एकूण 70 जणांची जवळपास 10 कोटींची फसवणूक करणार्‍या मीरा फडणीसचा जामीन यवतमाळ जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेतील अधिकारी करत आहेत. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश अमित लऊळकर यांनी मीरा फडणीसचा जामीन फेटाळला. आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस अधिकार्‍यांनी या प्रकरणाचा कसून तपास केला असून न्यायालयात ठोस पुरावे सादर केले. Meera Phadnis मीरा फडणीसला जामीन मिळू नये यासाठी सरकारी वकिलांनी न्यायालयात जोरदार युक्तीवाद केला. कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा असल्याने मीरा फडणीसचा जामीन फेटाळण्यात आला.
 
 
court Hamar
 
Meera Phadnis मीरा फडणीसकडून फसवणूक झालेले बहुतांश संघ, भाजपा परिवारातीलच आहेत. केंद्रीय मंत्रालयाच्या पर्यटन विभागात सल्लागारपदी नियुक्ती झाल्याचे सांगत मीरा फडणीस आणि अनिरुद्ध होशिंगने हा घोटाळा केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाने बनावट कार्यक‘म पत्रिका छापून रेल्वे गुंतवणूक परिषद आयोजित करून ऐनवेळी रद्दही केली होती. दरम्यान, मीरा फडणीसच्या विरोधात संघ परिवारातील अनेक पदाधिकार्‍यांच्या तक‘ारीनुसार यवतमाळ, नागपूरसह विविध ठिकाणच्या पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.