मेळघाटातील नागरिकांचा प्रवास झाला खडतर

    दिनांक :26-Jul-2024
Total Views |
- नद्यांचे पाणी वाहते पुलावरून

चिखलदरा, 
मागील आठवडाभरापासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे Melghat मेळघाटातील जंगल परिसरात प्रत्येक रस्ते खराब झाले आहेत. याबरोबरच काही गावांमध्ये जाणार्‍या रस्त्यांवर पूल छोटे असल्यामुळे फुलांवरून पाणी वाहत आहे. त्यामुळे या फुलांवरून प्रवास करणे धोकादायक असून नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहे.
 
 
melghat
 
Melghat : चिखलदरा तालुक्यातील कारंजखेडा या गावाजवळ अतिशय छोटा पूल आहे. या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे प्रवास करणे कठीण झाले आहे. तरीही नागरिक या पुलावरून मोटरसायकल व चार चाकी गाड्या काढत आहेत. परिणामी नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यासह अनेक ठिकाणचे रस्ते खराब झाले आहेत. या ठिकाणी वाहने चालवणे कठीण झाले आहे. सततच्या पावसामुळे चाळीस गावातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांना नदी व नाल्याच्या पुरातून रस्ता काढावा लागत आहे. दरवर्षी पावसाळ्यात मेळघाटातील रस्त्यांचा प्रश्न उपस्थित होतो; परंतु पावसाळा संपला की, प्रशासन या समस्यांकडे लक्ष देत नाही, ही गंभीर बाब असून मेळघाटातील सामान्य नागरिक व आदिवासी बांधवांना किमान चांगले रस्ते, चांगल्या दर्जाचे पूल मिळावेत, अशी अपेक्षा केल्या जात आहे.
 
 
Melghat याबाबत बोलताना हतरू येथील उपसरपंच भैयालाल मावस्कर म्हणाले की, कारंजखेडा गावाजवळ एक पूल असून तो अतिशय छोटा आहे. या पुलावरून पाणी सतत वाहते. मागील आठ तासापासून गावातील नागरिक बाहेर पडले नाहीत. हा पूल दुरुस्त केला नाही तर आंदोलन केले जाईल.