वैभव सूर्यवंशीच्या खेळीने सेलिब्रिटीही झाले भारावून!

आयपीएलचा जल्लोष

    दिनांक :30-Apr-2025
Total Views |
मुंबई,
Vaibhav Suryavanshi इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा जल्लोष सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत साऱ्यांवरच दिसून येतो. यंदाच्या मोसमात एक नाव झळकत आहे – वैभव सूर्यवंशी! राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या या केवळ १४ वर्षीय युवा खेळाडूने आयपीएलमध्ये इतिहास रचत सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळविल्या आहेत.
 
 

Vaibhav Suryavanshi  
गुजरात Vaibhav Suryavanshi  टायटन्सविरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने अवघ्या ३५ चेंडूत स्फोटक शतक झळकावले. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक झळकावणारा खेळाडू बनण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावे केला आहे. त्याच्या १०१ धावांच्या खेळीत ११ षटकार आणि ७ चौकारांचा समावेश होता. या अविस्मरणीय खेळीसाठी त्याला ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आले.वैभवच्या खेळीने क्रिकेटप्रेमींप्रमाणेच बॉलिवूडच्या कलाकारांनाही भारावून टाकले आहे. करीना कपूर खान, विकी कौशल, प्रीती झिंटा आणि अर्जुन कपूर यांनी सोशल मीडियावरून त्याच्या खेळीचे भरभरून कौतुक केले.
 
 
कौतुकाचा वर्षाव
 
 
करीना कपूरने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर वैभवचा फोटो शेअर करत लिहिले, "सामना पाहणे मजेदार होते, वैभव तुला सलाम... ही तर फक्त सुरुवात आहे." तर विकी कौशलने लिहिले, "ही खेळी इतिहासात नेहमीच लक्षात ठेवली जाईल. अतिशय अप्रतिम वैभव सूर्यवंशी."पंजाब किंग्जची सहमालक असलेल्या प्रीती झिंटाने आपल्या 'X' (माजी ट्विटर) अकाऊंटवर लिहिले, "वाह वैभव सूर्यवंशी.. तुझ्यात काय प्रतिभा आहे! १४ वर्षांचा असूनही इतकं जबरदस्त शतक झळकावणं खरंच रोमांचक आहे. भारतीय क्रिकेटचं भविष्य उज्ज्वल आहे."अर्जुन कपूरनेही स्टोरी शेअर करत लिहिले"वैभव, तुला सलाम! जबरदस्त... फक्त १४ वर्षांच्या वयात तू तुझी स्वप्ने जगत आहेस."दरम्यान, करीना कपूर शेवटची 'सिंघम अगेन'मध्ये अजय देवगणसोबत झळकली होती. आता ती मेघना गुलजार दिग्दर्शित 'दायरा' या चित्रपटात आयुष्मान खुराणासोबत दिसणार आहे.प्रीती झिंटा लवकरच 'लाहोर १९४७' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार असून ती सनी देओलसोबत झळकणार आहे.विकी कौशल 'महावतार' या चित्रपटात परशुरामांच्या भूमिकेत दिसणार असून हा चित्रपट २०२६ च्या ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे.तर अर्जुन कपूरकडे 'नो एंट्री २' हा बहुप्रतीक्षित सिक्वेल चित्रपट असून २००५ मध्ये आलेल्या 'नो एंट्री'चा हा पुढील भाग आहे.