सिलिंगच्या शेतजमिनी भोगवटदार वर्ग 1 करा

प्रशांत नांदे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

    दिनांक :11-May-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
मारेगाव, 
Agricultural : सिलिंगच्या भोगवटदार दोन असलेल्या शेतजमिनी भोगवटदार वर्ग एक करा, अशी मागणी तालुका भाजपा पदाधिकारी प्रशांत नांदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. आदिवासीबहुल तालुका मानल्या जाणाèया मारेगावात 1970 च्या दशकात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 500 हून अधिक शेतकèयांना सिलिंग जमीन वाटप केले.
 
 
jk
 
 
 
ज्याचा उद्देश असा होता की, भूमिहीन लोक शेती करून आपला उदरनिर्वाह करू शकतील. परंतु सिलिंगमधून वाटण्यात आलेली जमीन भोगवटदार 2 च्या ताब्यात असल्याने, सिलिंग जमीन असलेले 500 हून अधिक शेतकरी ही जमीन विकू शकत नाहीत, किंवा शेतीसाठी या जमिनीचा वापर करण्याव्यतिरिक्त कोणताही व्यवसाय करू शकत नाहीत. भाजपाचे प्रशांत नांदे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्याशीही पत्रव्यवहार केल्याचे निवेदनात म्हटले आहे.
 
 
 
शेतकèयांच्या या प्रश्नाला गांभीर्याने घेत, हंसराज अहिर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून, सिलिंगमध्ये सापडलेल्या शेतकèयांच्या जमिनीला भोगवटदार 1 करून ही समस्या सोडवण्याची मागणी केली आहे. भोगवट 2 च्या शेतजमिनी वर्ग 1 झाल्यास या जमिनीवर विविध प्रकारचे व्यवसाय करताना येणाèया अडचणी दूर होऊ शकतात. तसेच या जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहारही करता येईल.