अमरावती,
water supply cut off : अमरावती पाणी पुरवठा योजनेच्या १५०० मीमी व्यासाच्या पी.एस.सी. नेरपिंगळाई ते जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत असलेल्या गुरुत्ववाहीनीवर वडगाव माहोरे फाटयासमोर पाईप लाईन गळती झाल्यामुळे दिनांक 12 व 13 मे रोजी संपुर्ण अमरावती व बडनेरा शहराचा पाणी पुरवठा बंद राहील. गळती दुरुस्तीचे काम युध्द स्तरावर पुर्ण करण्यात येवुन अमरावती व बडनेरा शहरातील पाणी पुरवठा त्वरीत पुर्ववत करण्यात येईल. करीता नागरीकांनी पाण्याचा साठा करुन ठेवावा व पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे मजीप्रा मार्फत आवाहन करण्यात येत आहे.