श्रीकांत पवनीकर यांचा सर्वोत्तम पर्यटन पुस्तक पुरस्कार

    दिनांक :19-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Best Tourism Book Award नागपूरस्थित सुप्रसिद्ध साहित्यिक संस्था साहित्य विहारच्या २०२४/२५ राज्यस्तरीय पुरस्कारांत पर्यटन श्रेणीत लेखक व भ्रमणगाथाकार श्रीकांत पवनीकर यांचे एप्रिल २०२५ मध्ये प्रकाशित “नवराष्ट्रातील भटकंती- एका अनोळखी भारतात” हे पुस्तक सर्वोत्कृष्ट ठरले आहे. पुस्तकाची निर्मिती पुण्यातील प्रसाद प्रकाशन-अनाहत प्रकाशनच्या उमा बोडस आणि संदीप आठवले यांनी केली असून, नागपूर आणि पुण्यात स्वतंत्र प्रकाशन सोहळे पार पडले. हिंगणा येथील संत गाडगे बाबा महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. उल्हास मोगलेवार यांनी पुस्तकाला प्रस्तावना दिली आहे.
 
shrikant-pawnikar
 
पुस्तकात भारतातील ५५ पर्यटन स्थळांचा समावेश असून, आद्य शंकराचार्यांच्या जन्मस्थान “कालडी” पासून आंध्रप्रदेशातील प्रभु नरसिंहाच्या “सिंहाचलम” पर्यंत भ्रमणाचा अनुभव सखोल निरीक्षणावर आधारित आहे. विदर्भातील १२ अनोळखी पर्यटन स्थळांचा विशेष समावेश आहे. Best Tourism Book Award श्रीकांत पवनीकर यांचे २०२१ मध्ये प्रकाशित “एक भारावलेली भ्रमंती” या पुस्तकालाही राज्यस्तरीय पर्यटन पुरस्कार मिळाला होता. साहित्य विहारच्या प्रमुख आशा पांडे यांच्या नेतृत्वाखाली संस्था साहित्यिकांना सतत प्रोत्साहन देते.
 
पुरस्कार वितरण सोहळा
दिनांक: २३ नोव्हेंबर २०२५
स्थळ: वोकहार्ट, शंकरनगर, बाबुराव धनवटे सभागृह
वेळ: दुपारी २ ते ५
 
 
सौजन्य: श्रीकांत पवनीकर, संपर्क मित्र