नागपूर,
Nagpur News : भारतीय ज्ञान परंपरेचा आधुनिक शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आयोजन म्हणून, अर्थशास्त्र व नीतीशास्त्र या विषयावर दोन दिवसीय शिक्षक प्रशिक्षण सिंबायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट स्टडीजमध्ये आयोजित करण्यात आले होते.
आयोजन जगद््गुरू श्री देवनाथ इंस्टिट्यूट ऑफ वैदिक सायन्स अँड रिसर्च व सिंबायोसिस टीचिंग लर्निंग रिसोर्स सेंटर यांच्या संयुक्तविद्यमाने हा उपक्रम घेण्यात आला. प्रशिक्षक डॉ. भरत दाश यांनी अर्थशास्त्र व नीतीशास्त्र या प्राचीन भारतीय ग्रंथांद्वारे शासनप्रणाली, नेतृत्व व नीतिमूल्ये यावरील मूलभूत तत्वांचा अभ्यास करण्यात येऊ शकतो यावर भर दिला. विशेष आकर्षण चाणक्य यांचे सप्ताह सिद्धांत हे होते, ज्यात त्यांनी आधुनिक व्यवस्थापन व संघटनात्मक संरचनेत या तत्त्वांचा प्रभावीपणे संदर्भ दिला.
जगद््गुरू श्री देवनाथ इंस्टिट्यूट ऑफ वैदिक सायन्स अँड रिसर्च सेंटरचे संचालक आचार्य श्रेेयस कुèहेकर व अनुराग देशपांडे, सिंबायोसिस टीचिंग लर्निंग रिसोर्स सेंटरचे संचालक डॉ. समीर पिंगळे, समन्वयक डॉ. झेरिचो मारक, डॉ. भालचंद्र हरदास, डॉ. प्रफुल्ल साबळे, निरंजन देशकर यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.