नुकसानग्रस्तांना मदतीसाठी मुख्यमंत्र्याकडे नुकसान भरपाई द्या

    दिनांक :02-Jul-2025
Total Views |
बलढाणा,
Buldhana News मेहकर व लोणार तालुयांमध्ये दि. २५ व २६ जून रोजी झालेल्या ढगफुटी सदृश अतिवृष्टीमुळे दोन्ही तालुके अक्षरशः जलमय झाले असून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा)गटाचे आ. सिद्धार्थ खरात यांनी विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ५०० ते ७०० कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे.
 
 
Buldhana News
 
निवेदनात आ. सिद्धार्थ खरात यांनी म्हटले आहे की, या दोन्ही तालुयांमध्ये सरासरी २१२ मिमी पावसाची नोंद झाली असून, मेहकर तालुयातील काही भागांमध्ये हा पाऊस २०० ते २२७ मिमी दरम्यान कोसळला. शासनाच्या नियमांनुसार ६५ मिमी पेक्षा अधिक पावसाला नैसर्गिक आपत्ती मानून मदत दिली जाते, त्यामुळे या भागात झालेला पाऊस त्याच्या अनेक पट अधिक असल्यामुळे परिस्थिती पूर्णतः बिघडली आहे. Buldhana News याचबरोबर या दोन्ही तालुयांमध्ये आधीच मर्यादित असलेल्या पायाभूत सुविधांनाही जबरदस्त तडाखा बसला आहे. अनेक शेत रस्ते, गाव रस्ते, महावितरणचे विद्युत पोल, केबल्स, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते, पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे मार्ग, एमएसआरडीसीचे महामार्ग, जलसंधारण विभागाच्या पाझर तलाव व कालवे, समृद्धी महामार्ग, शेततळी आदींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
 
 
लोकप्रतिनिधी म्हणून मी तात्काळ या भागांचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी केली असून, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांना पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. Buldhana News शासनाच्या ३० मे २०२५ च्या आदेशानुसार एसडीआरएफ व एनडीआरएफ अंतर्गत नुकसान भरपाई देण्याच्या तपासण्या सुरू आहेत. या निवेदनाची शासन स्तरावर दखल घेतली जावी आणि शेतकर्‍यांना तात्काळ दिलासा मिळावा, ही संबंधित भागातील जनतेची अपेक्षा आहे.निवेदनाची प्रत पालकमंत्री मकरंद पाटील,बुलढाणा यांना सुद्धा भेटून देण्यात आली आहे.