नागपूर,
Nagpur Railway News : मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक ७ च्या पुनर्विकासाचे काम हाती घेतल्या जात आहे. स्टेशनवरील प्लॅटफॉर्मच्या विकास कामासाठी४ जुलै पासून ५२ दिवसांसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक ७ तात्पुरता बंद करण्यात येत असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून आली आहे.
दरम्यानच्या काळात संबंधित गाड्यांची सुरुवात व समाप्ती अजनी स्थानकावरून होणार आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागामार्फत रेल जमीन प्राधिकरणाच्या समन्वयाने नागपूर रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर मोठ्या प्रमाणावर उन्नयनाचे काम करण्यात येणार आहे.
रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर ५ दिवस दररोज २ तासांचा कॉरिडॉर ट्रॅफिक ब्लॉक घेतल्या आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. प्लॅटफॉर्म क्रमांक ७ बंद असल्यामुळे प्रभावित गाड्या नागपूर स्थानकाऐवजी अजनी स्थानकावरून सुरु व समाप्त होईल. यात अजनी स्थानकावरून प्रारंभ (शॉर्ट ओरिजिनेशन) रेल्वे गाडी क्र. २२१३७ नागपूर - अहमदाबाद एक्सप्रेस प्रस्थान: ८.२९ वा. (बुध, शनि, रवि) तर गाडी क्र. ११४०३ नागपूर- एक्सप्रेस प्रस्थान: १५.२८ (मंगळ, शनि), गाडी क्र. २२१४२ नागपूर- पुणे एक्सप्रेस प्रस्थान: १५.२५ वा. (शुक्रवार) अजनी स्थानकावर समाप्त (शॉर्ट टर्मिनेशन)होणार्या गाड्यांमध्ये गाडी क्र. २२१३८ अहमदाबाद—नागपूर एक्सप्रेसचे आगमन: १०.१५ वा. (सोम, मंगळ, शुक्र) तर गाडी क्र. ११४०४ कोल्हापूर- नागपूर एक्सप्रेस — आगमन: ११.२३ वा. (मंगळ, शुक्र), गाडी क्र. २२१४१ पुणे- एक्सप्रेस आगमन: १२.४७ वा.