वर्धा,
heavy rain देशातील ११ केंद्रीय कामगार संघटनांनी आज बुधवार ९ रोजी पुकारलेल्या एक दिवसीय संपाला पाठींबा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भर पावसात आयटक संलग्न कामगार संघटनेच्या सदस्यांनी आयटक राज्य सचिव दिलीप उटाणे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर घोंगडी घालून मोर्चा काढला. केंद्र व राज्य सरकारजी घोषणा करते ते पूर्ण करीत नाही. विधानसभेत आणि लोकसभेत जे लोकप्रतिनिधी आहे त्यांची वेतनवाढ मात्र दरवर्षी होते.

अंशकालीन स्त्री परिचर, शालेय पोषण आहार हे कर्मचारी पूर्णवेळ काम करतात. त्यांना महिन्याला फत तीन हजार रुपये मिळतात. केंद्र सरकारने ४४ कामगार कायदे बदलवून चार श्रम संहिता केले आहेत ते त्वरित रद्द करा, असंघटित अंगणवाडी, आशा, गटप्रवर्तक अंशकालीन स्त्री परिचर, शालेय पोषण आहार कर्मचारी, आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी, आदी कामगार कर्मचार्यांना किमान वेतन, सामाजिक सुरक्षा, तत्काळ देशव्यापी श्रम परिषद ४५ व ४६ नुसार सर्व त्वरित देण्यात यावे. स्वामीनाथन आयोगानुसार शेतकर्यांच्या मालाला हमी भाव द्या, शेतकर्यांना संपूर्ण कर्जमुती त्वरित द्या, कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा धोरण तत्काळ मागे घ्या, आदी विविध मागण्यासांठी हा मोर्चा काढण्यात आला.