तिरोडा,
panchayat-raj-abhiyan विविध विभागाच्या योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जातात. या योजनांची प्रभावी व जलद अंमलबजावणी करून त्यांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या टोकापर्यंत पोहचवा. लोकसहभागाची चळवळ निर्माण करून आरोग्य, शिक्षक, सामाजिक न्याय या मुख्य क्षेत्रामध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढून पंचायतराज संस्था गतीमान करण्यासाठी पंचायतराज अभियान शासनाने सुरू केले आहे. गावासाठी पंचायतराज अभियान विकासाचे वरदान आहे. यामध्ये जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी सहभागी होऊन शासनाच्या उद्देशाला यशस्वी करावे, असे आवाहन आ. विजय रहांगडाले यांनी केले.
पंचायजराज अभियानातंर्गत तिरोडा येथे आयोजित तालुकास्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पणाने झाली. कार्यशाळेला सभापती तेजराम चौव्हान, जिप सदस्य चत्रभूज बिसेन, उपसभापती सुनंदा पटले, हुपराज जमईवार, कुंता पटले, जयप्रकाश पटले, प्रमिला भलावी, ज्योती शरणागत, कविता सोनेवाने, चेतलाल भगत, दिपाली टेंभेकर, रिता पटले, जितेंद्र चौधरी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. प्रसंगी चत्रभूज बिसेन, तेजराम चौव्हान, हुपराज जमईवार, सुनंदा पटले यांनी यांनी मार्गदर्शन केले. panchayat-raj-abhiyan प्रास्ताविक गटविकास अधिकारी संघमित्रा कोल्हे यांनी केले. संचालन विस्तार अधिकारी अनुप भावे यांनी केले. आभार शितेश पटले यांनी मानले. कार्यशाळेला यशदाचे लीलाधर पटले, सरपंच, ग्रामसेवक, संगणकचालक, रोजगार सेवक तसेच सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आयोजनासाठी पंस कर्मचार्यांनी सहकार्य केले.