क्रीडांगणात दोन बिबट्यांची ‘एन्ट्री’

*फिरायला येणारे नागरिक धास्तावले *मूल शहरातील घटना

    दिनांक :15-Sep-2025
Total Views |
मूल, 
two-leopards-karmaveer-college शहरातील कर्मवीर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर रविवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास बिबट्याची दोन पिल्ले झाडावर बसलेली आढळून आली. रोजच्या प्रमाणे फिरायला आलेल्या नागरिकांना हे दृश्य पाहता आले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
 
 
two-leopards-karmaveer-college
 
या क्रीडांगणावर दररोज गावकरी, युवक व महिला मोठ्या संख्येने फिरायला येतात. याशिवाय परिसरात महाविद्यालयदेखील असल्याने अनेक विद्यार्थी ये-जा करतात. त्यामुळे या सर्वांना प्राण्यांच्या हल्ल्याचा धोका निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या बछड्यांची आई जवळपास असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असून, पुराच्या पाण्यापासून बचाव करण्यासाठी मादी बिबट्याने बछड्यांना झाडावर ठेवले असावे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती नागरिकांनी तात्काळ वनविभागाला दिली. वनविभागाने त्वरित गस्त वाढवली आहे. two-leopards-karmaveer-college गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जंगलातील बिळे, गुहा आणि नैसर्गिक अधिवास पाण्याखाली आले आहेत. त्यामुळे बिबट्या, रानडुक्कर व इतर वन्यजीव मानवी वस्त्यांच्या जवळ दिसू लागले आहेत. वनविभागाने नागरिकांना घाबरून न जाता सावधगिरी बाळगण्याचे तसेच कोणतीही वन्यजीव हालचाल दिसल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन केले आहे.