वर्धा भाजपा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सज्ज

*जिल्हा कार्यकारणी बैठकीतून शंखनाद

    दिनांक :15-Sep-2025
Total Views |
वर्धा, 
wardha bjp आगामी स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका, संघटनात्मक कार्याचा आढावा व नियोजनाकरिता भारतीय जनता पार्टी वर्धा जिल्हा कार्यकारिणी बैठकीचे आयोजन स्थानिक हेरिटेज येथे करण्यात आले होते. बैठकीला पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, भाजपाचे विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, जिल्हाध्यक्ष संजय गाते, आ. दादाराव केचे, आ. सुमित वानखेडे, आ. राजेश बकाने, सेवा पंधरवडाचे विदर्भ संयोजक धर्मपाल मेश्राम, नागपूर पदवीधर निवडणुकीचे प्रमुख माजी आ. सुधाकर कोहळे, माजी खासदारद्वय रामदास तडस, सुरेश वाघमारे, जिल्हा महामंत्री कमलाकर निंबोरकर, आकाश पोहाणे, अशोक कलोडे, सरिता गाखरे, जिल्हा महामंत्री अशोक कलोडे, जिल्हा मुख्यालय प्रमुख श्रीधर देशमुख, भुपेंद्र शहाणे, वरुण पाठक प्रामुख्याने उपस्थित होते.
 
 

fhfhf 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १७ सप्टेंबर वाढदिवसापासून ते महात्मा गांधी जयंती २ ऑटोबरपर्यंत सेवा पंधरवडा तसेच शिबिरं व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यात भाजपाचे सरकार व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतात त्यावेळी विरोधकांकडून समाजात मुद्दाम दरी निर्माण करण्यासाठी मराठा आरक्षणाचा विषय उभा केला जातो. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी आरक्षणाचे आंदोलन उत्तम रीतीने हाताळत कायदा व सुव्यवस्था उत्तम ठेवली याबद्दल त्यांचा अभिनंदनचा ठराव पारित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अभिनंदन ठराव आ. सुमित वानखेडे यांनी मांडला. त्याला आ. राजेश बकाने व आ. दादाराव केचे यांनी अनुमोदन दिले.
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांच्या प्रयत्नाने जिल्हा विकासाकडे घोडदौड करीत आहे. या विकास कामांसाठी माजी खासदार तडस यांनी पालकमंत्री व आमदारांचा अभिनंदनचा ठराव मांडला. त्याला माजी खासदार वाघमारे व जिल्हा महामंत्री सरिता गाखरे यांनी अनुमोदन दिले. जिल्हा कार्यकारिणींनी हा ठराव एकमताने मंजूर केला.wardha bjp 
यावेळी ना. डॉ. भोयर यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सर्वांनी कामाला लागण्याचे निर्देश देत विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थेत शतप्रतिशत भाजपा करण्याची उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत कार्य करावे असे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष गाते यांनी संघटन बाबींवर प्रकाश टाकीत वर्धा जिल्ह्यातील १३४२ बुथवरही कार्यकारणी तयार झाली असून त्यांचे काम सुरू झाल्याचे सांगितले. सेवा पंधरवड्याची माहिती धर्मपाल मेश्राम व जिल्हा संयोजक सुनील गफाट यांनी दिली. आगामी पदवीधर निवडणुकीच्या तयारीसाठी वर्धा जिल्ह्यातून मोठ्याप्रमाणात नोंदणी करण्याचे आवाहन माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी केले. आत्मनिर्भर भारत या अभियानाची माहिती जिल्ह्याच्या उपाध्यक्ष अर्चना वानखेडे यांनी दिली. संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी भाजपाला आतापर्यंत प्राप्त झालेली यश केवळ नेत्यांमुळे नसून या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याने केलेली मेहनत, त्यांच्या समर्पणामुळे यश प्राप्त झाले. हे समर्पण भविष्यातही अधिक वाढवण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.