वर्धा,
womans-mangalsutra-snatched : गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र हिसकाविण्याचा प्रयत्न एका महिलेने केला, पण महिलेनेही मोठ धाडस करून त्या चोरट्या महिलेस परिसरातील नागरिकांच्या मदतीने पकडून शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना शुक्रवार १६ रोजी स्थानिक निर्मल बेकरी चौक परिसरात घडली.
मकर संक्रांतीचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील रहिवासी ललीता सिंग या शहरातील मुख्य बाजारपेठेत साहित्य खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. त्या घर संसार सेल समोर काही साहित्य खरेदी करीत असताना एका महिलेने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकाविले. शिवाय ती पळ काढत असल्याचे लक्षात आल्यावर ललीता यांनी मोठ धाडस करीत परिसरातील नागरिकांच्या मदतीने चोरट्या महिलेला पकडले. शिवाय शहर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. अधिक विचारपूस केल्यावर ही महिला पुजा भोसले रा. वायफड पारधी बेडी येथील रहिवासी असल्याचे पुढे आले. त्या चोरट्या महिलेला शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे