आदिवासी इतिहास संग्रहालय कोनशिलेचे अनावरण

-विदर्भातील संस्कृतीचे विद्यापीठात होणार जतन

    दिनांक :31-Jan-2026
Total Views |
नागपूर, 
tribal-history-museum-cornerstone : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरात प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातत्व विभागाजवळ आदिवासी इतिहास संग्रहालयाच्या कोनशिलेचे अनावरण कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या झाले.
 
 
 
NGP
 
 
 
कुलसचिव डॉ. राजू हिवसे, वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल, मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्याम कोरेटी, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. मेधा कानेटकर, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. उमेश पलिकुंडवार, अधिसभा सदस्य दिनेश शेराम, प्रथमेश फुलेकर, पीएम उषा समन्वयक डॉ. रुपेश बडेरे, प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातत्व विभाग प्रमुख डॉ. प्रबास साहू व इतर अधिकारी उपस्थित होते.
 
 
शताब्दी महोत्सवी वर्षात विद्यापीठाला महाराष्ट्र शासनाकडून 100 कोटी रुपये प्राप्त झाले होते. त्यातून पीएम उषाच्या सहकार्यातून या संग्रहालयाची निर्मिती होत आहे. एकूण 4.43 कोटी रुपये खर्चून होत असलेल्या संग्रहालयात आदिवासी समुदायाचा इतिहास बघावयास मिळेल. विदर्भामध्ये एकूण जनसमुदायाच्या 23 टक्के लोकसंख्या आदिवासी समाजाची आहे. यामध्ये प्रामुख्याने गोंड, कोलम, माडिया, मेळघाटातील कोरुकू आदींचा समावेश आहे. आदिवासींच्या चाली-रिती, परंपरा, संस्कृती, जनजीवन यात दर्शविले जाणार आहे. पदव्युत्तर इतिहास विभागाच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याने विभाग प्रमुख डॉ. श्याम कोरेटी यांच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे. डॉ. मनाली क्षीरसागर यांनी संग्रहालय बांधकाम परिसराची पाहणी केली.