तभा वृत्तसेवा
महागाव,
accident-news : बायपासचे काम पूर्ण न झाल्याने अरुंद रस्त्यावरून जीवघेणी वाहतूक सुरू असून त्यामुळे तीन दिवसांत तीन बळी गेले आहेत. रेती वाहतूक करणाèया भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी टिप्परमध्ये घुसल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसèया गंभीर जखमी युवकाचा उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाल्याची घटना शनिवार, 31 जानेवारीला दुपारी 1 च्या दरम्यान हिवरासंगम येथे घडली. या ठिकाणी अपघाताची मालिकाच सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महागाव तालुक्यातील अंबोडा येथील देवानंद दोडके (वय 19) व त्याचा मित्र शुभम पाटे (वय 18) हे दोघे आपल्या पल्सर दुचाकी क्र. एमएच29 सीएफ8799 ने माहूरकडे जात होते. हिवरासंगम येथील अरुंंद डांबरी रस्त्यावरून समोरून भरधाव वेगाने येणाèया रेती वाहतूक करणाèया टिप्पर क्र. एमएच40 बीएल9544 ने या दुचाकीला धडक दिली.
यात दुचाकी टिप्परमध्ये घुसून मागील बाजूस अडकली. त्यामुळे टिप्पर पलटी होऊन घासत जाऊन रस्त्यालगत नालीत गेला. यात दुचाकीवरील देवानंद टायरखाली अडकून चेंदामेंदा झाला, तर शुभम गंभीर जखमी झाला.
हा अपघात घडल्याबरोबर बाजूच्या दुकानातील आशिष हातमोडे, संदीप बुळे व इतर युवकांनी धाव घेत टिप्परच्या समोरील भागात अडकलेल्या जखमी शुभमला बाहेर काढून त्याला उपचारासाठी माहूर आणि पुढे यवतमाळला शासकीय रुग्णालयात हलविले. परंतु शुभमची वाटेतच प्राणज्योत मावळली.
या अपघातामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती. अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार धनराज निळे, जमादार विनोद जाधव, सुनील राठोड, विवेक पारडकर, महामार्ग पोलिस मदत केंद्राचे उपनिरीक्षक किशोर गवई, जमादार सुभाष नागदिवे व कर्मचाèयांनी यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतुक सुरळीत केली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सवना येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
बायपासचे काम केव्हा ?
हिवरासंगम येथे महामार्गावर बायपास प्रस्तावित आहे. परंतु महामार्ग प्राधिकरणाच्या उदासीन धोरणामुळे बायपासचे काम अद्याप सुरू झाले नाही. त्यामुळे वाहतूक गावातील अरुंद रस्त्याने होत असल्याने वाढत्या वाहतुकीमुळे वारंवार अपघात घडत आहे. नुकताच गुरुवारी अपघात घडून त्यात एक युवकाचा बळी गेला आहे. त्यामुळे बायपासचे काम सुरू करण्यासाठी अजून किती जणांचे बळी महामार्ग प्राधिकरण घेणार, असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत.