कारंजात २०० दुचाकीस्वारांना हेल्मेट वाटप

    दिनांक :14-Oct-2026
Total Views |
कारंजा,
karanja-police-helmet-distributionवाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यासाठी पोलिस विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘जीवन सुरक्षा अभियानांतर्गत’ कारंजा शहरातील गोळीबार चौकात २०० हेल्मेटचे वाटप पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत कारंजा पोलिसांच्या वतीने पोलिस निरीक्षक प्रल्हाद मदन यांच्या हस्ते हेल्मेटचे वाटप करण्यात आले.
 
 
helmate
दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा नियमित वापर करावा, वाहतुकीचे नियम पाळावे आणि स्वतःसह इतरांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असा संदेश यानिमित्ताने देण्यात आला. यावेळी हेल्मेट वापरण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करीत उपस्थितांना वाहतूक नियमांचे पालन करण्याची शपथ देण्यात आली.
.
यावेळी पोलिस निरीक्षक प्रल्हाद मदन म्हणाले यांनी दुचाकी अपघातांमध्ये अनेकदा चालकांना गंभीर दुखापती होतात. हेल्मेटचा वापर केल्यास डोक्याला होणार्या गंभीर दुखापतींचा धोका कमी होण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन केले.
 
 
नागरिकांनी नियमांचे पालन करून अपघात टाळावे आणि सुरक्षित प्रवास करावा. यापूर्वीही कारंजा पोलिसांच्या वतीने १०० हेल्मेटचे वाटप करण्यात आले होते. आता २०० चे वाटप करण्यात आले ही जनजागृती मोहीम पुढेही सुरू ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे मदन यांनी सांगितले. १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी वाहने चालवू नये. पालकांनीही आपल्या अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देऊ नये आणि त्यांच्यावर योग्य देखरेख ठेवावी, असेही सांगण्यात आले.