खुनाच्या गुन्ह्यातील दोन वर्षांपासून फरार असलेले दोन आरोपी अटकेत

कारंजा ग्रामीण पोलिसांची कारवाई

    दिनांक :13-Nov-2026
Total Views |
कारंजा लाड,
accused arrested खुनाच्या गंभीर गुन्ह्यात मागील दोन वर्षांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना कारंजा ग्रामीण पोलिसांनी अटक करण्यात यश मिळविले आहे. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम राबवून दोन्ही आरोपींना १२ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले. सय्यद अफरोज सय्यद कादिर आणि सय्यद रिजवान ऊर्फ मोनू सय्यद रहमान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
 

accused arrested 
 
 
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुकेश दिगंबर भोसले रा. शिंगणापूर यांनी १ ऑटोबर २०२४ रोजी कारंजा ग्रामीण पोलिस ठाण्यात तोंडी तक्रार दिली होती. गावातील सय्यद बब्बू सय्यद याकुब, सय्यद तौसीफ सय्यद बब्बू, सय्यद बादशहा ऊर्फ आफ्रिदी सय्यद बब्बू, सय्यद अफरोज सय्यद कादिर, गन्नू अक्रम सय्यद, सय्यद शाहरूख सय्यद नबी, सय्यद सलीम सय्यद बुर्‍हाण, हारून इलियाज बेग, सय्यद रिजवान ऊर्फ मोनू सय्यद रहमान, परवेज खान जहागीर खान, आसिफ इबाल बेग, अलीम हासन सय्यद आणि रहमान बुर्‍हाण सय्यद यांनी संगनमत करून शेतात सोयाबीन काढण्यावरून झालेल्या वादातून फिर्यादीच्या भावसून सुमिता शिवमंगल भोसले यांची छेडखानी केली. तसेच फिर्यादीचा लहान भाऊ शिवमंगल दिगंबर भोसले यांना लाठ्या-काठ्या व लाथाबुयांनी गंभीर मारहाण करून जीवे ठार मारले होते. या प्रकरणी २ ऑटोबर २०२४ रोजी कारंजा ग्रामीण पोलिस ठाण्यात अप. क्र. ३८६/२०२४ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील आरोपी दोन वर्षांपासून फरार असल्याने पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे यांनी त्यांना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.accused arrested त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलिस निरीक्षक प्रविण शिंदे यांच्या आदेशानुसार तपास पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील चव्हाण, पोलिस हवालदार दीपक ढोबळे, पोकॉ तुषार भोयर आणि पोकॉ पल्लवी मोटे यांच्या पथकाने गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अफरोज सय्यद कादिर आणि सय्यद रिजवान ऊर्फ मोनू सय्यद रहमान यांचा शोध घेतला. त्यांचा पाठलाग करून महात्मा फुले चौक, कारंजा व दोनद फाटा परिसरातून दोन्ही आरोपींना ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणातील पुढील कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी, कारंजा यांच्या सूचनेनुसार सुरू आहे.