मोबाईल चोरून युपीआयद्बारे १.८४ लाख रुपये वळविले

    दिनांक :17-Feb-2026
Total Views |
वर्धा, 
Frakud ग्राहकाने काउंटरवर ठेवलेला मोबाईल चोरून युपीआय फोन पे द्बारे १ लाख ८४ हजार ९९८ रुपये दुसर्‍या खात्यात वळते केले. यात दुकानदार अनिल पुरोहित यांचे मोबाईल व वळते केलेली रकम असे १ लाख ९९ हजार ९९८ रुपयांची हेराफेरी केल्याची घटना १४ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी अनिल पुरोहित यांनी आधी ऑनलाईन व त्यानंतर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
 
 
fdkdk
 
Frakud  अनिल पुरोहित यांचे मालगुजारीपुरा येथील इंगोले चौकात अनिल फर्निचर नावाचे फर्निचरचे दुकान आहे. १४ रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास ३५ वर्षीय एक अनोळखी ग्राहक दुकानात आला आणि मला पलंग आणि खुर्ची विकत घ्यायची असल्याचे सांगितले. यावेळी अनिल पुरोहित दुकानात नसल्याने दुकानातील कर्मचारी अनिल बिंड यांनी फोन करून याबाबतची माहिती अनिल पुरोहित यांना दिली. ग्राहक आल्याने पुरोहित हे सुद्धा दुकानात आले. त्यांनी पलंग आणि खुर्चीचे २२ हजार ५०० रुपये होईल, असे सांगितले. यावेळी पुरोहित यांचा मोबाईल काउंटरवरच होता. त्याचवेळी दुसरा ग्राहक कुलर घेण्याकरिता आल्याने पुरोहित हे साहित्य दाखविण्यासाठी गेले. दरम्यान, परत आल्यानंतर पहिल्या ग्राहकाने मोबाईल चोरून पळून गेल्याचे लक्षात आले. त्याचा परिसरात शोध घेतला असता कुठेही आढळून आला नाही. याबाबतची तक्रार पुरोहित यांनी आधी ऑनलाईन केली. त्याच दिवशी रात्री ९ वाजता नवीन मोबाईल विकत घेतला आणि जुन्या मोबाईल क्रमांकाचे सीम सुरू केले. यावेळी त्यांना मोबाईलवर फोन पे व्हेरीफाय व इतर मॅसेज आले. १६ रोजी ते अ‍ॅसिस बँकेत गेले असता त्यांच्या खात्यातून १४ रोजी ९६ हजार ३०० रुपये व १५ रोजी ८८ हजार ६९८ असे १ लाख ८४ हजार ९९८ रुपये दुसर्‍या खात्यात फोन पे द्बारे वळते केल्याचे दिसून आले. पुरोहित यांनी तत्काळ शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.