विद्यापीठ अनुदान आयोग नियमावली लागू करा

विविध संघटनाच्या वतीने संविधान चौकात आंदोलन

    दिनांक :20-Feb-2026
Total Views |
नागपूर,
Implement University Grants Commission Regulations विद्यापीठ अनुदान आयोग नियमावली २०२६ लागू करा, आगामी जनगणनेत एससी, एसटीसह ओबीसी प्रवर्गाचा समावेश करावा, ईव्हीएम बंद करा, पेपरवर निवडणूक घ्या, नवीन कामगार विरोधी कायदे तात्काळ रद्द करा आदी मागण्यांसाठी राष्ट्रीय एकता आंदोलन, सकल ओबीसी महामोर्चा आणि विविध संघटनाच्या वतीने संविधान चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
 
 
नागपूर
या आंदोलनात मुख्य संयोजक अरुण गाडे, राष्ट्रीय एकता चळवळीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश पिसे, मधुकर उईके, राजेंद्र साठे, राहुल मुन,प्रताप पटले,
भागवतकर आदींचा सहभाग होता. महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, राष्ट्रीय संयुक्त मोर्चा, आशा व गट प्रवर्तक संघटना, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशन, संविधान परिवार, राष्ट्रीय चर्मकार महासंघ, राष्ट्रीय ओबीसी जनमोर्चा, तांडा सुधार समिती, संभाजी ब्रिगेड आदी संघटनेचे पदाधिकारी आंदोलनात होते. राष्ट्रीय एकता आंदोलन आणि सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने निदर्शने दिल्यानंतर नागपूरच्या जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.
...