बुलढाणा,
Sanjay Gaikwadलोणार तालुयातील चिखला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा बसविण्यावरून उद्भवलेल्या वादातून महिलांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आ. संजय गायकवाड यांनी तातडीने गावाला भेट देत पीडितांची विचारपूस केली. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

गावातील महिलांनी उभारलेल्या पुतळा हटवण्याच्या प्रयत्नातून वाद निर्माण होऊन काही महिलांवर हल्ला झाल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आ. गायकवाड यांनी पीडित संजीवर्नी वाघ यांची भेट घेत महिलांच्या सन्मानाला धक्का लावणार्यांना कायद्याने धडा शिकवला जाईल असे स्पष्ट केले. शिवरायांच्या स्मारकाच्या सौंदर्यीकरणासाठी २५ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली. तसेच धाडसाने पुढे आलेल्या संजीवनी वाघ यांचा सत्कार करून एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. पोलीस प्रशासनाने संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल करून बंदोबस्त वाढविला असून गावात शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले.याप्रसंगी मनोज जरांगे, आ. मनोज कायंदे, धर्मवीर युथ फाऊंडेशन अध्यक्ष पृथ्वीराज गायकवाड, नरेंद्र खेडेकर, शर्वरी तुपकर, शिवसेना शहर प्रमुख आशिष जाधव, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत गायकवाड, नगरसेवक सुनील सपकाळ, नयनप्रकाश शर्मा, बबलू मावतवाल, विलास गायकवाड, शुभम दांडगे, नंदू कर्हाडे यांच्यासह विविध पदाधिकारी, पोलीस अधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.