समर्थ ब्राह्मण मंडळ अध्यक्षपदी ऋषीकेश कासलीकर

    दिनांक :24-Feb-2026
Total Views |
यवतमाळ, 
येथील समर्थ ब्राह्मण मंडळ या नोंदणीकृत संस्थेच्या अध्यक्षपदी बांधकाम व्यवसायी, Rishikesh Kaslikar कासलीकर हार्डवेअरचे संचालक ऋषीकेश उर्फ मनीष विनायक कासलीकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. बालाजी सोसायटीतील श्री बालाजी मंदिर सभागृहात पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत ही निवड झाली.
 
 
kasli
 
मागील 30 वर्षांपासून ऋषी इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून बांधकाम व्यवसायात कार्यरत Rishikesh Kaslikar मनीष कासलीकर यांनी तरुण वयात मिळविलेले यश प्रशंसनीय आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मधील विविध शासकीय कार्यालयांच्या इमारतींचे उत्कृष्ट बांधकाम त्यांनी केले असून त्यात यवतमाळ बसस्थानक, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शहर पोलिस ठाणे व अवधूतवाडी पोलिस ठाणे यांचा समावेश आहे. आपली अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मनीष कासलीकर यांनी समर्थ ब्राह्मण मंडळाच्या सर्व ज्येष्ठ व आजीव सदस्यांचे आभार मानले आहेत.