विमानाचे तिकीट दुप्पट रेल्वे गाड्यांचे बुकिंग फुल्ल

    दिनांक :24-Feb-2026
Total Views |
होळीच्या सुट्टीदरम्यान आठवडाभर राहणार गर्दी
साडेचार हजाराचे तिकीट आता १० हजार

नागपूर,
होळी दरम्यानच्या काळात सुट्टी असल्याने २६ फेब्रुवारी ते ८ मार्च पर्यंतच्या रेल्वे आणि विमान प्रवास करणार्‍या प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागणार आहे. मात्र ज्या प्रवाशांनी यापूर्वीच विमान व रेल्वेच्या तिकीटा काढून ठेवणार्‍यांचा सुखकर होणार आहे. रेल्वे Train bookings full. गाड्यांमध्ये बुकिंग फुल्ल असल्याने वेळेवर तात्काळ तिकीटा मिळणे सुध्दा कठीण झाले आहे. होळीच्या सुट्टीत बाहेरगावी जाणार्‍यांची संख्या वाढल्याने खाजगी बसगाडयांचे प्रवास भाडे सुध्दा वाढले आहे.
 

bking 
 
सुट्टीला गृहीत धरुन प्रवासाचे नियोजन
येत्या २ मार्चला होळी तर ३ मार्चला धुलीवंदन असल्याने होळीकरिता आपल्या घरी जाण्यासाठी अनेकांनी शुक्रवारच्या प्रवासाचे तिकीट काढले आहे. शासकीय कर्मचार्‍यांना शनिवार, रविवार सुट्टी असल्याने होळी पूर्वीच्या सुट्टीला गृहीत धरुन अनेकांनी प्रवासाचे नियोजन केले आहे. यात बहुतांश कर्मचार्‍यांनी दोन आठवडयातील शनिवार व रविवार पकडून सुट्टीचे नियोजन केल्याने पर्यटन स्थळी वर्दळ दिसणार आहे.
विमानांच्या तिकिटांचे दर दुप्पट
होळीसाठी बाहेरगावी जाणारे प्रवासी दोन महिन्यापूर्वीच तिकीटा काढून तर वेळेवर तिकीटा काढणार्‍या प्रवाशांना जादा पैसे मोजून प्रवास करण्याशिवाय पर्याय नसतो. होळी पूर्वी २७ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यानचे तिकीट दर वाढले आहे. खाजगी एजंट मार्फत तिकीट काढणाार्‍यांना खिसा मोकळा करावा ठेवावा लागणार आहे. खाजगी बस, रेल्वे, विमान प्रवासाचे दरही गगनाला भिडल्याने वेळेवर प्रवास करणे अशक्य झाले आहेत. पासून तर गुरुवारपर्यंतच्या विमानांच्या तिकिटांचे दर दुप्पट वाढले आहे.

सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये बुकिंग फुल्ल
Train bookings full.  रेल्वे गाड्यांमध्ये बुकिंग फुल्ल असल्याने होळीपूर्वीच सर्व मार्गावरील गाड्यांमध्ये गर्दी वाढली आहे. विमान प्रवासाचे दरही गगनाला भिडले असून नागपूर ते पुणे, नागपूर ते मुंबई दरम्यानच्या प्रवासाकरिता पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागणार आहे. पुण्यातून नागपूरला येणार्‍या तिकिटांचे दर दिवसांच्या तुलनेत दुप्पट, तिप्पटीवर गेले आहेत. तसेच पुणे, मुंबई, दिल्लीहून नागपूरला येणार्‍या प्रवाशांना तिकीटांसाठी जादा पैसे द्यावे लागणार आहे.
वेटिंगमुळे प्रवासी त्रस्त
नोकरीनिमित्त मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगळुरू आदी शहरातून नागपूरात होळीकरिता येणार्‍यांची संख्या वाढली आहे. प्रवासी संख्या दुप्पट झाल्याने रेल्वेगाडयांमधील वेटिंगमुळे प्रवास करणे कठीण झाले आहे. होळीदरम्यानच्या होणारी गर्दी लक्षात घेता एअरलाईन्स कंपन्यांनी भाड्यात मोठी वाढ केली आहे. साडेचार हजार रुपयांत मिळणारे तिकीट आता १० हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे.