नागपूर,
advantage-vidarbha-mp-industrial-festival : असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटच्यावतीने आयोजित अॅडव्हांटेज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सवाच्या दुसर्या दिवशी आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींची उपस्थिती, बी२बी, बी२सी सेशनमुळे नागपूर व विदर्भातील उद्योजकांना आपले उत्पादने जागतिक बाजारपेठेत पाठविण्यासाठी सखोल झाली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात सुरू असलेल्या खासदार औद्योगिक महोत्सवात दिवसभर अनेक विषयांवर चर्चासत्र झाले. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसोबत बी२बी बैठकांना स्थानिक उद्योजकांनी चर्चेतून मार्ग ेकाढण्याचे ठरविले. भारताच्या औद्योगिक नकाशावर विदर्भाला एक सक्षम व उदयोन्मुख औद्योगिक केंद्र म्हणून अधोरेखित करण्यासाठी ग्लोबल इंडियन बिझनेस फोरमच्या संयुक्त वतीने आयोजित करण्यात आलेल्या बिझनेस कॉन्क्लेव्हसाठी रशिया, चीन, ब्राझील, इजिप्त, टोगो, गयाना, बेनिन, उरुग्वे, नायजेरिया, झांबिया, व्हेनेझुएला यांसह पेक्षा अधिक देशांचे राजदूत व व्यापार प्रतिनिधी सहभागी झाले होते.
महाविद्यालयातील युवकांची गर्दी
अॅडव्हांटेज विदर्भमध्ये औद्योगिक प्रदर्शन भरवण्यात आले असून यात डिफेन्स पब्लीक सेक्टर युनिट्स, सेबी, बीएसई, एनएसई, एमसीएक्स, एनसीडीएक्स, एएमएफआय, एमएसई, एनएसडीएल, सीडीएसएल सह आघाडीच्या वित्तीय संस्था, सियान अॅग्रो, सौरऊर्जा उत्पादक तसेच वस्त्रोद्योग, प्लास्टिक, खनिज, कोळसा, विमानन, लॉजिस्टिक्स, आयटी, फार्मास्युटिकल्स, संरक्षण, रिअल इस्टेट, अक्षय ऊर्जा, स्टार्टअप्स, ईव्ही कार, अॅड ज्वेलरी अशा विविध क्षेत्रांतील उद्योगांचे स्टॉल्स आहे. प्रदर्शन बघण्यासाठी दिवसभर महाविद्यालयातील युवकांची एकच गर्दी दिसून आली. ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरण्यात आलेले ड्रोन बघायलाही लोकांनी गर्दी फूड कोर्टमध्ये महाराष्ट्रीयन खाद्य पदार्थ, पाणीपुरी, पावभाजी, आईस्क्रीम, मोमोज, चहा, कॉफी आदी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.