नागपूर,
multi-specialty-hospital : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा मेट्रो) यांनी सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर ३५० पेक्षा अधिक खाटांचे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी क्वालिटी केअर इंडिया लिमिटेड म्हणजेच केअर ग्रुप ऑफ यांना शनिवारी ’लेटर ऑफ अॅक्सेप्टन्स’ दिले. ’लेटर ऑफ अॅक्सेप्टन्स’ अॅडव्हान्टेज विदर्भ २०२६च्या खासदार औद्योगिक महोत्सव या कार्यक्रमाच्या दुसर्या दिवशी असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पवन कुमार यांना लेटर ऑफ अॅक्सेप्टन्स’ सुपूर्द केले. या प्रसंगी महा मेट्रोचे संचालक अनिलकुमार कोकाटे तसेच महा मेट्रोचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सदर लेटर ऑफ अॅक्सेप्टन्समुळे महा मेट्रो नागपूरसाठी नॉन-फेअर बॉक्स रेव्हेन्यू विभागात महत्त्वपूर्ण प्रगती साध्य झाली आहे. प्रस्तावित मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाची उभारणी पार्क मेट्रो स्थानकाजवळील महा मेट्रोच्या करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ६०० कोटींपेक्षा अधिक खासगी गुंतवणूक अपेक्षित असून, नागपूर शहरात अंदाजे १,५०० ते १,८०० थेट रोजगार संधी निर्माण होणार आहेत.