यवतमाळ,
illegal-domestic-gas-cylinder : जिल्ह्यातील हॉटेल, भोजनालय, बार-रेस्टॉरंटमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर करणाèयांविरुद्ध प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून भरारी पथकांकडून धडक कारवाई सुरू आहे. यात महागाव, हिवरा, धनोडा, गुंज इत्यादी ठिकाणांसह विविध हॉटेलमधून 13 भरलेले घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. ही कारवाई जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या निर्देशांनुसार आणि जिल्हा पुरवठा अधिकाèयांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. पथकातील तहसीलदार रोहित शिंदे, पुरवठा निरीक्षण अधिकारी मोहन कोल्हे, नायब तहसीलदार पवार, गोदाम व्यवस्थापक राम बनसोडे तसेच लिपिक लखन चव्हाण यांनी ही कारवाई केली.