नागपूर,
Prasad Nagar Jayatala Road प्रसाद नगर, जयताळा रोड परिसरात चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हनुमान जयंतीनंतर दुसऱ्याच दिवशी प्रसाद नगर येथील हनुमान मंदिरात चोरीची घटना घडली. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी शिव मंदिरातही चोरट्यांनी हात साफ केला.
दोन्ही ठिकाणी दानपेटी फोडून त्यातील रक्कम लंपास करण्यात आली. याशिवाय एका दुकानाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्नही करण्यात आला, मात्र त्यात चोरट्यांना यश आले नाही. Prasad Nagar Jayatala Road या सलग घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून पोलिस प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. सीसीटीव्ही यंत्रणा, पोलीस गस्त वाढवणे आणि संशयितांवर लक्ष ठेवणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सौजन्य:शर्मिला चौरसिया,संपर्क मित्र