हितोपदेश ‘संधी प्रकरण’ ग्रंथाचे प्रकाशन

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
चार ग्रंथांची मालिका पूर्ण

वणी, 
भारतीय शिक्षणपद्धतीतील कथात्मक नीतीशिक्षणाचा उत्कृष्ट नमुना मानल्या जाणाèया ‘हितोपदेश’ या प्राचीन ग्रंथाच्या ‘sandhi prakaraṇ’ grantha prakashana ‘संधी प्रकरण’ या चौथ्या ग्रंथाचे प्रकाशन नुकतेच झाले असून यासह चार ग्रंथांची मालिका पूर्णत्वास पोहोचली आहे. विशेष म्हणजे या ग्रंथाचे लेखक विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांचा हा 93 वा ग्रंथ ठरला आहे. नारायण पंडित विरचित ‘हितोपदेश’ हा मौलिक ग्रंथ प्राचीन काळापासून नीतीशिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. पाटलीपुत्र नगरीचे राजा सुदर्शन यांच्या तीन पुत्रांना पंडित विष्णुशर्मा यांनी प्राणी व पशुपक्ष्यांंच्या कथांद्वारे दिलेला हा उपदेश आजही मार्गदर्शक ठरतो.
 
 
hitopdesh
 
मित्रलाभ, सुहृदभेद, विग्रह व संधी अशा चार प्रकरणांनी हा ग्रंथ समृद्ध असून यापूर्वी तीन प्रकरणांवरील ग्रंथ प्रकाशित झाले होते. आता ‘संधी प्रकरण’ प्रकाशित झाल्याने ही ग्रंथमालिका पूर्ण झाली आहे. या ग्रंथमालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ कथा सांगण्यापेक्षा कथा अशी का आहे, याचा सखोल विचार मांडण्यात आला आहे. प्रत्येक कथेतून काय शिकावे व काय टाळावे, याचे सुस्पष्ट विवेचन करण्यात आले आहे. आधुनिक जीवनात या कथांचा उपयोग कसा होतो, यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यामुळे ही मालिका संस्कृत व संस्कृतीप्रेमींसाठी अत्यंत उपयुक्त व संग्राह्य ठरत आहे.
 
 
‘sandhi prakaraṇ’ grantha prakashana  वणीच्या लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे संस्कृत विभागप्रमुख तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संस्कृत अभ्यासक्रम मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेल्या या ग्रंथांमुळे नव्या पिढीवर संस्कार घडविण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. पुणे येथील प्रसाद प्रकाशनद्वारा प्रकाशित या ‘हितोपदेश संधी प्रकरण’ ग्रंथाची पृष्ठसंख्या 135 असून किंमत 165 रुपये आहे. चारही ग्रंथ एकत्रित स्वरूपातही उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी 8446037890 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रकाशक उमा जोशी यांनी केले आहे.