- प्रियकर पत्नीसह पाेहचला प्रेयसीच्या घरी
अनिल कांबळे
नागपूर : शहरातील Yashadharanagar incident यशाेधरानगर परिसरात लग्नापूर्वीच्या प्रेयसीने विवाहित प्रियकराच्या माेबाईल ’हाय’ मेसेज पाठवला. ताेच मेसेज नेमका त्याच्या पत्नीने बघितला. त्यामुळे दाेघांचे वैवाहिक जीवन उद्ववस्त हाेण्याच्या मार्गावर आले. ताे पत्नीसह थेट पहिल्या प्रेयसीच्या घरी गेला. त्या मॅसेसवरून दाेन गटांमध्ये भीषण संघर्ष झाल्याची धक्कादायक घटना समाेर आली आहे. साेशल मीडियावरील मेसेजमधून सुरू झालेला वाद थेट चाकूहल्ला आणि हत्या प्रयत्नापर्यंत पाेहाेचला. या रक्तरंजित संघर्षात काही युवक जखमी झाले असून पाेलिसांनी दाेन्ही गटांविरुद्ध हत्या प्रयत्नासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण नावाच्या युवकाने आपल्या प्रेयसीच्या इंस्टाग्राम आयडीवरून अमित नावाच्या युवकाला ‘हाय’ असा मेसेज पाठविला. संबंधित तरुणी ही पूर्वी अमितची प्रेयसी हाेती. मात्र तिचे लग्न झाल्यानंतर दाेघांचे संपर्क कमी झाले हाेते. अचानक तिच्याच आयडीवरून मेसेज आल्याने अमित चक्रावला आणि पत्नीला साेबत घेऊन त्या तरुणीच्या घरी पाेहाेचला. तेथे चाैकशीदरम्यान हा मेसेज करणने मुद्दाम चिथावणीखाेर पद्धतीने पाठविल्याचे उघड झाले. त्यानंतर अमितने करणशी संपर्क साधला. मात्र, बाेलताना करणने ‘आता ती माझी प्रेयसी आहे,’ असे सांगितल्याने वाद अधिकच चिघळला.
Yashadharanagar incident यानंतर दाेन्ही बाजूंनी वाद मिटवण्यासाठी यशाेधरानगर परिसरात बैठक ठरविण्यात आली. मात्र चर्चा हाेण्याऐवजी वातावरण तापले आणि दाेन्ही गटातील युवक आमनेसामने आले. शाब्दिक वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर हाणामारी आणि चाकूबाजीत झाले. या घटनेत काही युवक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी मेयाे रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.
पाेलिसात तक्रार देणे टाळले
जखमींनी पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केली. मात्र शुक्रवारी मध्यरात्री गस्त घालत असताना यशाेधरानगर पाेलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पाेलिसांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेत तपास सुरू केला आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला. पाेलिसांनी दाेन्ही गटांविरुद्ध हत्या प्रयत्नासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल केले असून आराेपींचा शाेध सुरू आहे. जखमी युवकांची संपूर्ण ओळख अद्याप स्पष्ट झालेली नसून पुढील तपास यशाेधरानगर पाेलीस करीत आहेत.