पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीची आत्महत्या

    दिनांक :17-May-2026
Total Views |
- प्रेमविवाहनंतर 12 वर्षांनी संसार उध्वस्त

अनिल कांबळे
नागपूर, 
Husband's Suicide पत्नीच्या काही युवकांसाेबत असलेल्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने घरी गळास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी मृत तरुणाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आणि पाेलिस चाैकशीनंतर, पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीष (34) असे मृतक पतीचे नाव आहे.
 
 
susid
 
माहितीनुसार, रघुपतीनगर, वाडी येथे राहणारा मनीष याचे 12 वर्षांपूर्वी पूजा नाावच्या तरुणीसाेबत ओळख झाली हाेती. ओळखीनंतर दाेघेही प्रेमात पडले. एकमेकांवर जीवापाड प्रेम जडल्यानंतर दाेघांनी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. दाेघांनी कुटुंबियांच्या विराेधात जाऊन प्रेमविवाह केला. त्यांना दाेन मुले आहेत. दाेघांचा संसार सुरळित सुरु हाेता. मात्र, दरम्यान पूजा हिला अन्य युवकांशी मैत्री करण्याची सवय ज़डली. ती पती घराबाहेर गेल्यानंतर वेगवेगळ्या युवकांना घरी बाेलावत हाेती. मागील काही दिवसांपासून पूजा ही ाेनवर वेगवेगळ्या व्यक्तींशी बाेलत असल्याने पती-पत्नीत नेहमी वाद आणि घरगुती भांडणे हाेत असत.
 
Husband's Suicide  दरम्यान, 14 मार्च राेजी पूजा ही प्रणय नावाच्या तिच्या प्रियकरासाेबत घर साेडून पळून गेली हाेती. मनीषने तिचा शाेध घेऊन तिला विजयवाडा येथून परत घरी आणले. मात्र, नागपुरात आल्यानंतर ती पुन्हा आपल्या माहेरी निघून गेली. तिने आपल्या दाेन्ही मुलांची जबाबदारी घेण्यासही स्पष्ट नकार दिला. या संपूर्ण प्रकारामुळे मनीष अत्यंत मानसिक तणावाखाली वावरत हाेता. पत्नीने दिलेल्या या मानसिक छळाला कंटाळून अखेर 20 एप्रिल राेजी मनीषने आपल्या राहत्या घरात छताच्या पंख्याला दाेरी बांधून गळास घेतला. या घटनेनंतर वाडी पाेलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नाेंद केली हाेती.
 
 
पत्नीकडून सतत व्हायचा छळ
अकस्मात मृत्यूच्या चाैकशी दरम्यान, मृत मनीषची आई कविता देवानंद देशभ्रतार यांनी वाडी पाेलिसात पूजाविरुद्ध लेखी तक्रार दिली. पूजाच्या सततच्या छळामुळे आणि त्रासामुळेच मनीषने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. या तक्रारीच्या आधारे वाडी पाेलिस ठाण्याचे पाेलिस उपनिरीक्षक उत्तम जायभाये यांनी आराेपी पत्नी पूजाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.