कामाच्या शोधात गेलेल्या युवकाचा अपघाती मृत्यू

    दिनांक :17-May-2026
Total Views |
समुद्रपूर, 
Samudrapur Accident येथील दीपक गिरोले हा युवक पुणे येथे काम शोधायला गेला असता तेथून तो मुंबईला गेला. मात्र, रेल्वे स्थानकाच्या छतावरून पडून त्याचा अपघाती मृत्यू झाला. ही घटना १४ मे रोजी घडली. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने मुंबईवरून त्याचा मृतदेह आणू शकत नव्हते. दरम्यान, आ. समीर कुणावार यांच्या मदतीने दीपकचा मृतदेह आज रविवार १७ रोजी सकाळी त्याच्या घरी पोहचवण्यात आला.
 
 
deepak
 
Samudrapur Accident  समुद्रपूर येथील प्रकाश गिरोले यांना तीन मुलं आहे. त्यातील दोन मुलं मतिमंद तर दीपक हा तिसरा मुलगा मिळेल ती कामं करून कुटुंबाला हातभार लावत होता. दरम्यान, दीपक हा १० दिवसांपूर्वी पुणे येथे कामाच्या शोधात गेला. तेथील त्याचे मित्र शशिकांत वझे व कोल्हे यांच्यासोबतच कंपनीमध्ये कामाला जाऊ लागला. तीन दिवसांतच त्याचे मानसिक संतुलन बिघडले व कामावर न जाता नागपूरला येणार्‍या रेल्वेची तिकीट काढून मुंबईच्या ट्रेनमध्ये बसून १३ रोजी मुंबईला पोहोचला. तेथील लोकमान्य टिळक टर्मिनल रेल्वेच्या छतावर चढला व तेथून त्याला पोलिसांनी उतरविताना तो खाली पडून गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्याला घाटकोपरच्या रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान १४ रोजी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या खिशातील एटीम व मोबाईल क्रमांकावरून त्याची ओळख पटली. शशिकांत वझे याला माहिती मिळताच तो मुंबईला पोहचला. त्याचा मृतदेह समुद्रपूरला कसा न्यायचा, कुटुंबातील व्यती सुद्धा तेथे पोहचू शकत नव्हते. दरम्यान, ही माहिती शशिकांत वझे याने आ. कुणावार यांना फोनवरून दिली. त्यांनी आर्थिक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. त्याचा मृतदेह घरी पोहचल्या नंतर आ. कुणावार यांनी त्याच्या घरी जाऊन