भाजपाची आढावा बैठक; सरकारी योजना जनतेपर्यंत पोहचविण्यावर भर

    दिनांक :17-May-2026
Total Views |
संघटनात्मक बाबींचा आढावा
 
वर्धा, 
Wardha: Bharatiya Janata Party meeting भारतीय जनता पार्टी वर्धा जिल्हा पदाधिकार्‍यांची बैठक स्थानिक हेरिटेज ग्रँड येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी संघटनात्मक बाबींचा आढावा घेण्यात येऊन अधिक जोमाने केंद्र व राज्य सरकारच्या लोकोपयोगी योजना जनतेपर्यंत पोहचविण्यावर भर देण्यात आला. बैठकीला पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र कोठेकर, प्रदेश उपाध्यक्ष व नवनिर्वाचित आमदार संजय भेंडे, जिल्हाध्यक्ष संजय गाते, विदर्भ विभाग संयोजक दिनेश सूर्यवंशी, प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार रामदास तडस, आ. राजेश बकाने, सुनील गफाट, नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर, स्वाती गुल्हाने, राणी कलोडे, जिल्हा महामंत्री कमलाकर निंभोरकर, आकाश पोहाणे, अशोक कलोडे, जिल्हा मुख्यालय प्रभारी श्रीधर देशमुख यांच्यासह सर्व जिल्हा पदाधिकारी, मोर्चा अध्यक्ष-महामंत्री, मंडळ अध्यक्ष-महामंत्री उपस्थित होते.
 
 
bjp
 
Wardha: Bharatiya Janata Party meeting  यावेळी नवनियुत प्रदेश उपाध्यक्ष उपेंद्र कोठेकर, नवनिर्वाचित आमदार व वर्धा जिल्हा प्रभारी संजय भेंडे, प्रदेश उपाध्यक्ष रामदास तडस, मोर्शी जिल्हा प्रभारी अविनाश देव यांचा सत्कार करण्यात आला. पंतप्रधान मोदी यांच्या मन की बात हा कार्यक्रम जिल्ह्यातील बुथवर यशस्वीपणे राबविल्याबद्दल सर्व मन की बातचे संयोजक, विधानसभा प्रमुख व मंडळ अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. बैठकीमध्ये संघटनात्मक बाबींचा आढावा घेण्यात आला. सखोल मतदार पूर्णवलोकन अभियानात सर्व बुथवर कार्यकर्त्यांनी शासनाला सहकार्य करावे व मतदार यादी अधिक पारदर्शक करण्यावर भर देण्यात आला. आगामी पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसंदर्भात यावेळी चर्चा होऊन मतदार नोंदणी अधिक जोमाने करण्याचे नियोजन करण्यात आले. २६ व २७ मे रोजी यवतमाळ येथे होणार्‍या जिल्हा प्रशिक्षण वर्गाला पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी केले.