अतिविशेष उपचार सुविधांसह मोफत शस्त्रक्रिया व औषध वाटप
दारव्हा,
‘aarogya sankalp’ राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माँ आरोग्य सेवा समिती आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय यांच्या विद्यमाने दारव्हा येथे भव्य मोफत रोगनिदान, शस्त्रक्रिया, उपचार व औषधी वाटप महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे ‘आरोग्य संकल्प अभियान’ रविवार, 21 जून रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत विरजी भिमजी घेरवरा हायस्कूल येथे होणार आहे. या महाशिबिरामध्ये अनेक अतिविशेष आणि तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने हृदयरोग तपासणी, महिलांची ब्रेस्ट कॅन्सर तपासणी, गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी, कॅन्सर तज्ञांद्वारे विविध कॅन्सरची तपासणी, वंध्यत्व समुपदेशन, व्हेरीकोज वेन्स आणि किडनी तपासणी यांसारख्या अत्यंत खर्चिक चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. यासोबतच भरती रुग्णांच्या सर्वसामान्य चाचण्या सोनोग्राफी, सीटीस्कॅन, एमआरआय, एक्स-रे, रक्त व लघवी चाचणी पूर्णपणे मोफत केली जाईल.