नागपूर,
ekankika spardha अमरावती येथे पार पडलेल्या अद्वैत विदर्भ करंडक-२०२६ एकांकिका स्पर्धेत रंगभूमी, नागपूर संस्थेच्या ‘३..२..१..स्टार्ट!’ या एकांकिकेने दमदार कामगिरी करत पाच पुरस्कारांसह अद्वैत करंडकावर आपले नाव कोरले. या यशामुळे विदर्भातील नाट्यवर्तुळात नागपूरच्या रंगकर्मींचे विशेष कौतुक होत आहे.
मुग्धा पाथ्रडकर लिखित आणि शैल चौधरी दिग्दर्शित या एकांकिकेने उत्कृष्ट सादरीकरण करत विदर्भातून सांघिक प्रथम क्रमांक पटकावला. एकांकिकेत ओंकार काळे, समर बोबडे, शशांक रहांगडाले, चित्तरंजन कावरे, तृप्ती वालधुरकर, श्वेता गणवीर, सारंग टोपरे आणि बालकलाकार श्रीपाद टोपरे यांनी प्रभावी अभिनय साकारला. स्पर्धेत या एकांकिकेला विविध विभागांत मानाचे पुरस्कार मिळाले. दिग्दर्शन विभागात शैल चौधरी यांना द्वितीय क्रमांक, प्रकाशयोजनासाठी अक्षय खोब्रागडे यांना प्रथम क्रमांक, पार्श्वसंगीतासाठी साक्षी गव्हाने आणि विशाल हाडगे यांना द्वितीय क्रमांक, तर अभिनय (स्त्री) उत्तेजनार्थ प्रथम पुरस्कार तृप्ती वालधुरकर आणि श्वेता गणवीर यांना प्रदान करण्यात आला. प्रकाशयोजना अक्षय खोब्रागडे आणि ऋषभ धापोडकर, नेपथ्य पुण्यशील लांबट, रंगभूषा श्रद्धा रोकडे, वेशभूषा निकिता तेलंगे, तर पार्श्वसंगीत साक्षी गव्हाने आणि विशाल हाडगे यांनी सांभाळले.