- आरोपींना पाच दिवसांची कोठडी : फरार मौलवीचा शोध सुरू
अनिल कांबळे
नागपूर,
Exploitation of women धर्मांतरण आणि लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी मंगळवारी पीडित तरुणी आणि आरोपी अय्याज ताज मदारे (वय २६) यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणातील इतर तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे काम पोलिसांकडून सुरू असून छिंदवाडा येथील फरार मौलवीचा शोध अद्याप लागलेला नाही. दरम्यान, या प्रकरणात पीडितेच्या परिचयातील एका महिलेचे नावही चर्चेत आले असून तिचीही चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अय्याज मदारेने २०२५ पासून महिलेशी ओळख होती. वारंवार लैंगिक शोषण केले आहे. तसेच विवाहासाठी तिच्यावर धर्मांतरणाचा दबाव टाकत तिला छिंदवाडा येथे एका मौलवीकडे नेल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या मौलवीच्या शोधासाठी सोमवारी सोनेगाव पोलिसांचे पथक छिंदवाडा जिल्ह्यात रवाना झाले होते. संभाव्य ठिकाणी छापे टाकण्यात आले, मात्र संबंधित मौलवी पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
छिंदवाड्यातील हॉटेलमध्येही लैंगिक शोषण
तपासादरम्यान आरोपीने पीडित महिलेला छिंदवाड्यातील एका हॉटेलमध्ये नेल्याची बाब समोर आली आहे. त्यावेळी महिलेच्या परिचयातील एका महिलेने संबंधित घटनेचा व्हिडीओ चित्रीत केल्याची चर्चा आहे. तसेच आरोपी विविध हॉटेल्स तसेच महिलेच्या घरी तिचे लैंगिक शोषण करत होता आणि नग्न फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करून आर्थिक वसुलीही करीत होते. या प्रकाराला कंटाळून पीडितेने एका सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्याशी संपर्क साधून संपूर्ण घटना सांगितली आणि संबंधित व्हिडीओही त्यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे समोर आले आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलिस अधिकारी स्वतः तपासावर लक्ष ठेवून आहेत. पीडितेच्या परिचयातील महिलेची चौकशी सुरू असून फरार मौलवीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. तपास अद्याप सुरू आहे.
धर्मांतरणासाठी दबाब
विवाहितेच्या शोषणाचा हा प्रकार गेल्या आठ महिन्यांपासून सुरू होता. काही दिवसांपूर्वी तामीया येथील मौलाना या विवाहितेवर कलमा पढण्यासाठी दबाव टाकत होता. धर्मांतरण केले नाही तर शारिरीक संबंधांचे चित्रिकरण समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकीही तिला दिली जात होती. या तिघांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत विवाहितेने सोनेगाव पोलीसठाणे गाठत तक्रार केली. त्याची दखल घेत पोलिसांनी मदारे आणि शेख या दोघांना अटक केली.