आज यवतमाळ अर्बन को.ऑप. बँकदारव्हा शाखेचा वर्धापनदिन सोहळा

    दिनांक :16-Jun-2026
Total Views |
दारव्हा, 
Yavatmal Urban Co-op. Bank शहरातील नावारूपास आलेली यवतमाळ अर्बन को. ऑप बँक शाखा दारव्हाचा बुधवार, 17 जून रोजी वर्धापनदिन सोहळा साजरा होतो आहे. या सोहळ्याला अध्यक्ष तथा संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा दारव्हा शहरातील प्रतिष्ठीत नागरिक, सभासद, खातेदार, ठेवीदार, हितचिंतक, दैनिक मधूसंचयी ठेव प्रतिनिधी तथा सर्व कर्मचाèयांनी उपस्थितीत राहण्याचे आवाहन शाखा व्यवस्थापक संदीप उरगुंडे यांनी केले आहे.
 
 
kytl
 
दारव्हा शाखेची सुरवात 14 जुन 1996 ला झाली. उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले आहे. तेव्हापासून अविरत जनतेच्या सेवेत यवतमाळ अर्बन बँक मागील 29 वर्षांपासून विश्वास, प्रगती, आणि सुरक्षित आर्थिक भविष्याची परंपरा जोपासत नव नवे यशाचे शिखर गाठत आहे. ही बँक संपूर्ण संगणकीकृत असून सीबीएस प्रणालीवर कामकाज करीत असून, एटीएम सुविधा व अत्याधुनिक सुविधा बँकेच्या ग्राहकांकरिता सुरू आहे. तालुक्यातील व शहरातील जनतेचा जिव्हाळा, विश्वास बँकेने संपादन केला आहे. या सोहळ्याला सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन शाखा व्यवस्थापक संदीप उरगुंडे यांनी केले आहे.