बुलढाणा
drought-like-conditions-list राज्याच्या दुष्काळसदृश जिल्ह्यांच्या यादीत बुलढाण्याचा समावेश नसल्याने नुकसानग्रस्त शेतकर्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जातआहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर १८ जिल्ह्यांचा यादीत समावेश केला; मात्र पावसाचा दीर्घ खंड, कोरडवाहू पिकांची अवस्था आणि उत्पादनातील संभाव्य घट पाहता बुलढाणा जिल्हा यादीबाहेर ठेवण्यामागील निकष नेमका कोणता असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.
ऐन पिकांची वाढ होण्याच्या अवस्थेत दिड महिना पावसाने दडी मारली परिणमाी फुलधारणा आणि दाणे भरण्याच्या अवस्थेवर परिणाम झाल्याने उत्पादनात घट होण्याची शयता आहे. जिल्ह्यातील एकही महसूल मंडळ पावसाच्या खंडापासून सुटलेले नसताना बुलढाण्याचा दुष्काळसदृश जिल्ह्यांच्या यादीत समावेश का करण्यात आला नाही, हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यात यंदा खरीप पेरणी जवळपास ९८ टक्के क्षेत्रावर झाली. शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या संदर्भात क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी संत्पत प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राज्य सरकारने राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्याची यादी जाहीर केली. या यादीत अठरा जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यातून बुलढाणा जिल्हा वगळण्यात आला. या जिल्ह्यात केंद्रिय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, कामगारमंत्री आकाश फुंडकर तसेच भाजप शिवसेना शिंदे गट आमदार असतांना सुद्धा आत्महत्याग्रस्त बुलढाणा जिल्हयाचे नाव जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा आरोप माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केला आहे.
\दुष्काळग्रस्त जिल्हा जाहीर करावा असा आग्रह भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना केला. दरम्यान केंद्रियमंत्री व राज्यमंत्र्यांचे स्वतःच्या मतदारसंघात शेतकर्यांची सहानभूती दुष्काळग्रस्त शेतीपिकांची पाहणी करण्यासाठी दौरे झाले. त्यामध्ये भाजपच्या आ. श्वेता महाले, शिंदेसेनेचे आ. संजय गायकवाड सुद्धा आघाडीवर होते. राज्यात सत्ता असतांना सुद्धा त्यांच्या मागणीची दखल सरकारने घेतली नाही. हे दुर्दैव असल्याचे सुबोध सावजी यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.